नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कानपूरमध्ये दारुच्या नशेत दारूच्या किंमती वाढवण्यासाठी लावण्यात आलेले पोस्टर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. पोस्टरमध्ये पीएम मोदी आणि योगी सरकार यांचे फोटो ठेवून एका दारुड्याने दारूच्या नशेत सरकारला मागणी केली आहे की सरकारने दारूचे दर वाढवावेत आणि वाढीव किंमतीतून मिळालेल्या पैशांनी त्यांची पत्नी आणि आईला सबसिडी द्यावी.
आपल्या या आनोख्या मागणीने दारु पिणाऱ्या संजय शर्मा यांचे नाव कानपूरमध्ये चांगलेच गाजले आहे. त्यांनी मागणी केली आहे की, 100 रुपयांना मिळणारी क्वार्टर (२५० एमएल) आता २०० रुपयांना झाली आहे, त्यामुळे आता दारुच्या किंमतीत जी 100 रुपयांनी वाढ केली ती दारु पिणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला किंवा आईला सब्सिडी म्हणून देण्यात यावी.
दारुची किंमती वाढल्याने स्वत: दारुच्या नशेत असलेले संजय शर्मा पोस्टर लावून आंदोलन करत आहेत. त्यांनी सांगितले की ते रोज दोन क्वार्टर दारु पितात. एक बॉटल दारु ते त्याच दुकानात पितात आणि एक घरी घेऊन येतात. रोज दारु पिणाऱ्या या संजय शर्मा यांची मागणी भले ही सरकार मान्य करणार नाही, परंतू कुटूंबियांना नक्कीच आनंद होईल की दारु पिणाऱ्या शर्मा यांनी ते पित असलेल्या दारुची सब्सिडी कुटूंबाला मिळावी अशी मागणी केली. दारु मुळे देशात अनेक घरात रोज हिंसेच्या अनेक घटना घडतात. अनेकदा दारु पिण्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून पत्नी आणि मुलांना मारहाण केली जाते. आता या पोस्टरची चर्चा रंगली आहे.
Visit : bahujannama.com