कर्नाटक : वृत्तसंस्था – कर्नाटकच्या दक्षिण कन्नडमध्ये विचित्र घटना घडली असून ती समजताच तुम्हाला हसू येईल. येथील एका घरात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला असताना त्याने असे काही तरी केले ज्यामुळे तो पकडला गेला.
हे प्रकरण उप्पीनंगडी पोलीस ठाण्याच्या उल्लास जंक्शनजवळील आहे. एका घरात एक दारुडा चोर घुसला. चोराने पहिल्या मजल्यावरून घराच्या छतावरील फरशीला तोडले आणि आता घुसला. घरात घुसल्यावर घर लुटण्यासाठी चाव्या शोधत होता. थोडा शोध घेतल्यावर सगळ्या चाव्या टीव्ही स्टॅण्डच्या जवळ ठेवलेल्या सापडल्या.
दरम्यान तो थकला. त्याला खूप झोप येऊ लागली. त्याच्यानंतर तो चोर हातात सगळ्या चाव्या तशाच घेऊन घरातील सोफ्यावर झोपून गेला. घराचे मालक सुदर्शन यांनी सांगितले की, जेव्हा ते सकाळी उठले तेव्हा त्यांनी त्यांचे छताच्या फरशा तुटलेल्या पाहिल्या. आणि एका अनोळखी व्यक्तीला सोफ्यावर घोरत झोपलेले पाहिले. यानंतर चोराला छडीने मारत उठवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
घरात तोडफोड करणाऱ्या चोराची ओळख पटली असून त्याचे नाव अनिल सहानी आहे. घरमालकाचे म्हणणे आहे की, कदाचित चोर पहिल्यापासूनच मद्यधुंद असेल. चोर बिहारच्या माजीपुर जिल्ह्यात राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु आहे.