बहुजननामा ऑनलाइन : आपल्या नोकरी वेळी मद्यपान करणे किती महागात पडू शकते, याची प्रचिती एका फ्लाईट ऐअरहोस्टेस ला आली आहे. तीने फ्लाईट मध्ये इतकी दारू पिली होती , कि तिला नीट व्यवस्थित उभे देखील राहता येत नव्हते. त्यामुळे तिला नोकरी वरून काढून टाकण्यात आले.
अमेरिकेच्या युनायटेड एक्सप्रेस च्या फ्लाईट मध्ये काम करणाऱ्या एअरहोस्टेस दारूच्या च्या नशेत आढळली, तिने इतके मद्यपान केले होते , कि फ्लाईट पॅसेंजरनाच तिची मदत करावी लागली.
अमेरिकेतील विसकॉनसिनमध्ये राहणारी ४९ वर्षाची हि ज्युलिया एअरहोस्टेस म्हणून काम करत होती. तिच्या या कृत्यामुळे तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले . तिच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपासादरम्यान उघडकीस आले कि , तिने लिमिटपेक्षा ५ पट जास्त दारू पिली घेतल्याचे आढळले . ती २ ऑगस्ट च्या शिकागो ते इंडिया जाणाऱ्या फ्लाईट मध्ये सर्व्हिस करणार होती. परंतु तिला नीट सीटबेल्ट संबंधित सूचना देखील देता येत नव्हती , कि ना ती व्यवस्थित उभी राहू शकत होती. प्रवाशांना हा सगळा प्रकार समजला.
एका व्यक्तीने एअरलाईन ला ट्विट करून सांगितले कि, आमची फ्लाईट अटेंडेड नशेतमध्ये आहेत. ती व्यवस्थित उभी देखील राहू शकत नाही तसेच ती प्रवाशांचे सामान देखील पडत आहे. तसेच दुसऱ्या प्रवाशाने देखील तक्रार दाखल करत सांगितले कि, ‘तिला स्वतःचा फोन उचलण्याचे देखील भान नव्हते. ‘
तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सांगितले कि तिने फ्लाईट दरम्यान वोडका पिली होती.