मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील (Dr. Narendra Dabholkar Murder Case) आरोपी विक्रम भावेला (Vikram Bhave) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high court) सशर्त जामीनातून तात्पुरता दिलासा दिला आहे. आरोपी विक्रम भावे यांच्या वडिलांचे 25 जूनला निधन झाल्याने विविध विधी व वडिलांशी संबंधित बँकिंग व्यवहार करण्यासाठी तीन आठवड्यांपुरते रत्नागिरीत राहण्याची मुभा देण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात (Dr. Narendra Dabholkar Murder Case) विक्रम भावेला मे 2019 मध्ये अटक केली होती. Dr Narendra Dabholkar Murder Case bombay highcourt give temp bail to vikaram bhave
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यातील NIA कोर्टाच्या हद्दीत रहावे लगणार
हायकोर्टाने विक्रम भावेचा 6 मे रोजी जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहे. या अटींप्रमाणे भावेला पुण्यातील विशेष एनआयए कोर्टाच्या हद्दतच रहावे लागणार आहे. तसेच, रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी निघण्यापूर्वी आणि 10 ऑगस्ट रोजी परल्यानंतर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) हजेरी लावून तपशील देण्याचे हायकोर्टाचे निर्देश दिले आहेत. रत्नागिरीमधील देवरुख पोलीस ठाण्यातही दर रविवारी हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने भावेला दिले आहेत.
विक्रम भावेच्या वकीलांचा युक्तीवाद
6 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयानं विक्रम भावेला कठोर अटीशर्तींसह जामीन दिला होता. याप्रकरणी सीबीआयचा (CBI) तपास अद्याप सुरु आहे. आरोपीविरोधात आरोप निश्चित होणं आणि खटल्याला सुरुवात होणं या गोष्टी नजीकच्या काळात तरी शक्य नाहीत. आणि आरोपीविरोधात नव्यानं साक्षपुरावे सापडणं आणि नवे आरोप लागणंही शक्य नाही, असा युक्तीवाद बचावपक्षानं हायकोर्टात केला. जो न्यायालयाने ग्राह्य धरला.
SSC Result 2021 | दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार !
…तर जामीन रद्द
न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानंच भावेला एक लाख रुपयांच्या व्यक्तीगत जामीन मंजूर केला होता. मात्र, हा जामीन मंजूर करताना पुढील एक महिना दररोज तपास अधिकाऱ्यांपुढे हजेरी, त्यानंतर पुढचे दोन महिने एक दिवसाआड हजेरी लावणं अनिवार्य राहील. तसेच खटल्याला नियमित हजर राहणे, साक्षी पुरावे प्रभावित न करणं, कोणतेही गैरकृत्य न करणं, पुणे सत्र न्यायाल्याच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई केली. यापैकी एकही अट मोडल्यास जामीन रद्द करण्यात येईल असंही हायकोर्टाने आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे.
कोण आहे विक्रम भावे ?
हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून विक्रम भावे हा काम करत होता. 4 जून 2008 रोजी ठाण्यातील पनवेलमधील थिएटर आणि गडकरी रंगायतन याठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी विक्रमला 10 वर्षांची शिक्षा झाली होती. मध्यंतरीच्या काळात तो जामिनावर बाहेर आला होता. डॉ. नरेंद्र दाभोळकरांना ज्या ठिकाणी गोळी मारली जाणार होती त्या ठिकाणची भावेने पुर्वतपासणी केली होती. या हत्याकांडामध्ये वापलेलं पिस्तूल नष्ट करण्यासाठी भावेने मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
Web Title : Dr Narendra Dabholkar Murder Case bombay highcourt give temp bail to vikaram bhave
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Grain ATM |फक्त आधार क्रमांकाचा वापर करून ATM मधून धान्य मिळवता येणार !
Pune Police News | वारजे माळवाडी पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्यांना अटक