September 20, 2020
बहुजननामा ऑनलाइन – राज्य पोलिस दलातील काही अति वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची पदोन्नतीवर गडचिरोली येथे बदली झाली होती. त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडे सोपविला होता. दरम्यान, डॉ. अभिनव देशमुख यांची कोल्हापूरहून पुण्यात पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. त्यामुळे डॉ. अभिनव देशमुख यांनी आज प्रभारी पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडून पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदाची सुत्रे स्विकारली.
Comments are closed.