असा मिळणार ५ GB डेटा
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रीपेड ४ जी सब्सक्रायबर्सला गुगल प्ले स्टोरवरून एअरटेल थँक्स या ॲपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करून युजरला मोबाईल नंबरने रजिस्टर करावे लागेल. एअरटेल कंपनीच्या म्हण्यानुसार, प्रत्येक युजरच्या अकाउंटमध्ये ७२ तासांच्या आत १ जीबीचे पाच कूपन क्रेडिट करण्यात येतील. ही ऑफर मिळवण्यासाठी काही नियम व अटीसुद्धा आहेत. या ऑफरसाठी एक मोबाईल नंबर एकदाच वापरता येणार आहे. एअरटेलने हेसुद्धा सांगितले आहे की जर यूजर ५जीबी डेटा फ्री मिळवण्यात योग्य असेल, तर आता मिळत असलेला २जीबी डेटा फ्री ऑफर बंद होईल.
एअरटेलकडून सांगण्यात आले की तुम्ही जर ५ GBच्या ऑफरसाठी क्वॉलिफाइ झाला तर ऑटोमेटिकली कूपन क्रेडिट झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाइलला येईल. एसएमएस आल्यानंतर एअरटेल थँक्स ॲपच्या माय कूपन्स सेक्शनमध्ये जाऊन आपले कूपन व्ह्यू करून क्लेम करावे. क्रेडिट झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत १ जीबीचे कूपन रिडिम करण्यात येईल. या कूपनची वैधता ३ दिवस असणार आहे. ३ दिवसांच्या आत तुम्हला हे कूपन एअरटेल थँक्स ॲपवरून क्लेम करावे लागेल, अन्यथा ३ दिवसांनी ते आपोआप एक्सपायर होईल.