बहुजननामा ऑनलाईन टीम : शनिवारी अचानक कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे अजित पवारांच्या या निर्णयामुळे नाराज झालेले शरद पवार यांनी भाजसपोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. या घडामोडीनंतर अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे सर्वसामान्यांकडून मोठा विरोध होत असल्याचे दिसत आहे.
साहेब मी स्वतः काल तुम्हाला 7-8कॉल केले नॉट रीचेबल लागत होता तुमचा फोन किती टेन्शन घेतलं मी काल पासून हे फक्त माझ्या घरच्या ना माहीत तुम्ही सुद्धा पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन कारण उत्तर तुम्हाला नाही ओ कार्यकर्त्यांना द्यावे लागत
— Siddhesh Nikam Patil (@NikaSi_SiD) November 24, 2019
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत ११ आमदार होते. यामध्ये धनंजय मुंडे आघाडीचे होते. यापैकी जवळजवळ ९ ते १० आमदार शरद पवारांकडे परत आले आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे संपूर्ण दिवस नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते देखील अजित पवारांसोबत असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. काही तासानंतर धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहिले.
मी पक्षासोबत, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणीही कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती.@PawarSpeaks @NCPspeaks
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 24, 2019
अजित पवाराच्या बंडखोरीत धनंजय मुंडे देखील सामील असल्याची चर्चा पसरली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षासोबत आणि शरद पवार यांच्यासोबतच असून कोणीही संभ्रम निर्माण करु नये, अशी पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती. त्यावर लगेचच प्रतिक्रिया सुरु झाल्या. ट्विटरवर एका कार्यकर्त्याने प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेना चांगलेच सुनावले. कार्यकर्त्याने ट्विटमध्ये म्हटले की, ‘साहेब मी स्वतः तुम्हाला सात ते आठ कॉल केले. तुमचा कॉल नॉट रिचेबल होता. तुम्ही पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन, कारण जनतेला उत्तर आम्हाला द्यावे लागतात.’ या कार्यकर्त्याच्या प्रतिक्रियेचा स्क्रिनशॉट सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रतिक्रियेमुळे धनंजय मुंडेच्या निर्णयावर किती राग व्यक्त करण्यात येतो आहे हे स्पष्ट झाले आहे.
Visit : bahujannama.com