नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या परिवारासह भारतात पोहचले आहेत.सकाळी अकराच्या सुमारास अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशवासियांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. मोटेरा स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनीही बॉलिवूड चित्रपटांचे खुलेआम कौतुक केले. शाहरुख खान-काजोलच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाचा त्यांनी उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय सिनेमाची व्याप्ती खूप मोठी आहे. येथे दरवर्षी सुमारे दोन हजार चित्रपट केले जातात. येथील चित्रपटांमध्ये भांगडा आणि इतर संगीत उत्कृष्ट आहे. त्यांनी शाहरुख खान आणि काजोलचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि शोलेचे कौतुकही केले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारताने जगाला सचिन आणि विराटसारखे मोठे खेळाडू दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल जादा सावधान ’ चित्रपटाचे कौतुकही केले होते . वास्तविक, ब्रिटीश कार्यकर्ते पीटर गॅरी टॅचल यांनी ‘शुभ मंगल जादा सावधान’शी संबंधित एक ट्विट शेअर केले होते . त्यांनी लिहिले होते की बॉलीवूडचा एक रोमँटिक कॉमेडी रिलीज झाला आहे. भारतात समलैंगिकतेला कायदेशीरपणा मिळाल्यानंतर आता या चित्रपटाच्या मदतीने देशातील वृद्ध लोक जागरूक होण्यासाठी मदत मिळेल. पीटर यांचे हे ट्विट रीट्वीट करताना ट्रम्प यांनी चित्रपटाला शानदार म्हटले होते.
https://twitter.com/realDonaldTrump/status/1230881724445249536
या भारत भेटीत ट्रम्प आणि मोदी यांच्यात बर्याच योजनांवर चर्चा होईल. ट्रम्प यांच्यासमवेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि मुलगी इव्हांका ट्रम्प हे भारतात आहेत.