नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोठ्या बोलणीनंतर अमेरिका आणि तालिबान यांच्यात करार झाला असणं दोन्ही पक्षांनी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्तावाला पुढे केले आणि अमेरिका आपली सेनेला परत बोलावण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला चेतावणी दिली असून जर काहीही चुकीचे झाले तर पुन्हा इतकी सेना पाठवतील की त्याचा विचारही केला नसेल, असे त्यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी तालिबानी नेत्यांसह भेट घेणार असून ही ऐतिहासिक संधी आहे. यावेळी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे १३ हजार पेक्षा जास्त सैनिक असून अमेरिका मागच्या १८ वर्षांपासून तिथे लढा देत आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, ‘जर काही चुकीचे झाले, तर आम्ही परत येऊ. मी स्पष्ट करतो की आम्ही परत जाऊ आणि पूर्ण ताकदीने परत येऊ. ज्याची कल्पना कोणीही केली नसेल. त्याची गरज आहे असे मला वाटत नाही. अशीच अपेक्षा आहे.’
ट्रम्प तालिबानी नेत्यांना लवकरच भेट असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच तालिबान आमच्यासोबत मिळून दहशतवाद्यांना मारणार असून ते लवकरच आमच्या लढाईमध्ये सहभागी होतील. अफगाणिस्तानमध्ये चांगलेच यश मिळाले असून आता आपल्या लोकांना परत आणण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
तालिबानबरोबर झालेल्या कराराबद्दल माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, तालिबानबरोबर झालेल्या कराराअंतर्गत आम्ही १४ महिन्यांत आपल्या सैन्याला परत बोलावणार. विशेष म्हणजे कतारमधील दोहामध्ये अमेरिका आणि तालिबान नेत्यांनी या करारावर स्वाक्षरी केली असून यादरम्यान भारतासह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.