नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात सामर्थ्यवान व्यक्ती, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या परिवारासह भारतात पोहचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि मुलगी इवांका देखील आहेत. डोनाल्ड ट्रम्प ज्या विमानातून भारतात दाखल झाले त्याचे नाव एअरफोर्स वन आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांचे विशेष एअरफोर्स वन’ विमान ज्याला चालते -फिरते व्हाईट हाऊस म्हणून देखील ओळखले जाते. यात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया काय आहे याची खासियत.
वास्तविक, ‘एअरफोर्स वन’ ची जबाबदारी अध्यक्ष एलिफ्ट ग्रुप वर सोपवण्यात आली आहे, हा गट व्हाइट हाऊस मिलिटरी ऑफिसचा एक भाग आहे. अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्या निर्देशानुसार १९४४ मध्ये एरलिफ्ट ग्रुपची स्थापना राष्ट्रपती पायलट कार्यालय म्हणून करण्यात आली. या विमानाची खास ओळख म्हणजे त्यात अमेरिकेच्या राष्ट्रीय ध्वजाचे चित्र आणि राष्ट्रपतींचा शिक्का यांचा समावेश आहे. या विमानामधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते नियमित विमानांच्या तुलनेत हवेमध्ये देखील इंधन भरू शकते.
क्षेपणास्त्रने सुसज्ज
हे विमान प्राणघातक लेसर आणि क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. जर शत्रूने हल्ला केला तर विमानातूनच क्षेपणास्त्र हल्ला केला जाऊ शकतो. जर शत्रूने या क्षेपणास्त्राचा हल्ला देखील चुकवला तर लगेच विमानाच्या विंग मध्ये असलेली मशिनगन धडाधड गोळयांचा मारा करू शकते.
अत्याधुनिक सुविधांयुक्त हे विमान 70 मीटर लांबीचे आहे. या विमानात ४ हजार चौरस फूट जागा आहे. एअरफोर्स वन 965 किमी / तासाच्या वेगाने उड्डाण करू शकते.
कोणताही धोका निर्माण झाल्यास या विमानात असलेले एस्केप पॉड म्हणजेच खास पद्धतीच्या कॅप्सूल च्या मदतीने राष्ट्रपतींना सुरक्षित बाहेर काढले जाऊ शकते. विमानात राष्ट्रपतींजवळ न्यूक्लिअर वेपन लॉन्च करण्यासाठी बटन असते .
या विमानात संरक्षक उपकरण , रडार जॅमर , रेडिओ अँटिना आणि सायबर हल्ला किंवा मिसाईल याना ओळखणारे सेंसर आहेत.
एअरफोर्स वन जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बोइंग 747-200 बी शृंखला मधील हे विमान आहे. म्हणूनच त्याला उडते फिरते ‘व्हाइट हाउस’ म्हणतात.
असे कोणतेही काम किंवा सुविधा नाही ,जी या विमानात उपल्ब्ध नाही, अत्याधुनिक सुरक्षा आणि दळणवळणाच्या साधनांव्यतिरिक्त, हवेमध्ये इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे ते बर्याच तास सतत हवेत राहू शकते.
या सर्व सुविधांव्यतिरिक्त, विमानात राष्ट्रपति कार्यालयासाठी, विश्रांतीची खोली आणि आवश्यक असल्यास पूर्णपणे सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधा आहे. विशेष म्हणजे हे विमान एकट्याने उडत नाही. शत्रूला फसवण्यासाठी यासारखे आणखी एक विमानही हवेतच राहते.