बहुजननामा ऑनलाईन टीम – आपल्या जीवनात आपण गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. नवीन ठिकाण शोधण्यापासून ते एखादी माहिती सर्च कारण्यापर्यंत आपण लगेच गुगलचा वापर करतो. पण एक लक्षात ठेवा जर का तुम्हाला नेहमीच गुगलची मदत घेण्याची सवय असेल तर त्वरित सावधान व्हा. कारण अशा काही गोष्टी आहेत ज्या गुगलवर शोधल्या नाही पाहिजेत.
गुगलवर या गोष्टी कधीही शोधू नका
गुगलवरून कधीही आपल्या बँकेची वेबसाईट सर्च करू नका. या पद्धतीच्या महत्त्वाच्या वेबसाईटचा ऍड्रेस लक्षात ठेऊन थेट तिचे युआरएल टाकून ओपन करा. कारण जरा का गुगलवर त्याला मिळती जुळती वेब साईट उघडली आणि तुम्ही त्यावर आपली माहिती टाकली तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
एवढेच नाही तर एखाद्या कंपनीचा कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक सुद्धा तुम्ही शोधू नका. कारण गुगलवर अनेक खोट्या वेबसाईट बनवून त्यावर खोटे नंबर टाकले जातात. अशा वेळी तुम्हची मोठी फसवणूक होऊ शकते.
गुगलवर कोणत्याही सॉफ्टवेअर आणि ऍप साठी सर्च करू नका. अशा सॉफ्टवेअर आणि ऍप साठी नेहमी गुगल प्लेचाच वापर करावा.
जर का तुम्ही गुगलवरून एखाद्या आजाराबाबत माहिती घेत असाल तर शक्यतो असे करणे टाळा. तुम्ही आजारी असाल तर गुगलवरून माहिती घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही जर का एखादी सरकारी योजना किंवा सरकारी वेबसाईट शोधत असाल तर तुमची फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. कारण अनेक लोक सरकारी वेबसाईटशी मिळती जुळती साईट बनवून ठेवतात. यामुळे तुम्हची फसवणूक होऊ शकते.
गुगलवर ई कॉमर्स वेबसाईटच्या ऑफर्स आणि कुपन कोडचे सुद्धा सर्चिंग करू नका. कारण अनेक लोक याद्वारे तुम्हची फसवणूक करू शकतात. तसेच फ्री अँटी व्हायरस ऍप आणि सॉफ्टवेअर सुद्धा गुगलवर शोधण्याचे टाळा.
Visit : bahujannama.com