पिंपरी बहुजननामा ऑनलाईन : कॉंग्रेसचे लोक म्हणतात प्रियंका गांधींमध्ये इंदिरा गांधी दिसतात. मग तुम्हाला प्रकाश आंबेडकरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर का दिसत नाहीत? आम्हाला त्यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर दिसतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांनी बारा जागांची मागणी केली आहे. केवळ बोलणी सुरु आहे असे कॉंग्रेस म्हणते. त्यांना सन्मानाने जागा द्या. असे एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले. ते पिंपरी-चिंचवड येथे वंचित बहुजन आघाडी सभेच्या जाहीर सभेत बोलत होते.
नितीन गडकरी काल एका सभेत म्हणाले, दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास जनता सळो की पळो करेल. हे कोणासाठी होते ते सांगायची गरज आहे का? मग आता पोलिसांनी भाजप मंत्री आणि नेत्यांना सुरक्षा द्यावी. ही जनता त्यांचं काय करेल हे तर गडकरीनींच सांगितले. असा टोलाही त्यांनी मारला.
एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी नांदेडच्या सभेत घोषणा केली की आमची अलर्जी असेल तर आम्ही जागा लढविणार नाही. प्रकाश आंबेडकर यांना सन्मानाने जागा द्या, ते आज हजला गेले आहेत. त्यामुळे ते पुण्यात येऊ शकले नाहीत. ते नक्कीच सभांना हजेरी लावतील असे त्यांनी सांगितले.