बहुजननामा ऑनलाईन टीम – जगभरात थैमान घालणार्या कोरोना व्हायरसवरील औषधाच्या संशोधनामध्ये मोठे यश मिळाल्याचा दावा बांगलादेशच्या एका वैद्यकिय पथकाने केला आहे. बांगलादेशमधील वरिष्ठ डॉक्टरांचा या वैद्यकिय पथकामध्ये समावेश आहे. दोन औषधांच्या मिश्रणाने कोरोनारुग्ण बरे होत असल्याचे सांगण्यात आले आहे. चार दिवसांत 60 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे केल्याचा दावा या पथकाने केला आहे.
दोन औषधांच्या मिश्रणाचा वापर करुन तयार करण्यात आलेले औषध कोरोनाची लागण झालेल्या 60 रुग्णांना देण्यात आले होते. ते सर्वजण बरे झाले असा दावा बांगलादेश मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या औषध विभागाचे प्रमुख डॉ. मोहम्मद तारेख आलम यांनी केला आहे. हे औषध परिणामकारक असून रुग्णांचे अर्धे लक्षण 3 दिवसात गायब झाले आहेत. सर्व कोरोनाग्रस्त चार दिवसांमध्ये बरे झाले असेही डॉ.आलम यांनी नमूद केले आहे. रुग्णांवर डॉक्सीसाइक्लिन अँटीबायोटिक आहे, तर इव्हर्मेक्टीन अँन्टीप्रोटोझोल औषध म्हणून वापरले जाते. औषधाचे साइड इफेक्ट नसल्याचाही दावा त्यांनी केला.
औषध करोनावरील उपचारावर परिणामकारक ठरेल याबाबत शंभर टक्के आशावादी आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच, औषधाला मान्यता मिळावी यासाठी यासाठी संबंधित सरकारी नियामकांशी संपर्क साधला असून औषध आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही डॉ. आलम म्हणाले.