बहुजननामा ऑनलाइन टीम – बदाम खाणं आपल्या स्मरणशक्तीसाठी खूप फायदेशीर (almonds)असतं. याच्या तेलाचाही आपल्याला खूप फायदा होतो. बदामात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ब जीवनसत्व, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने असतात. आज आपण याच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
1) शरीरात रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते.
2) अनेकदा बदामाच्या सालीत असणाऱ्या घटकामुळं त्याचं पचन होणं कठिण होतं. म्हणून बदाम रात्रभर भिजत ठेवा. यामुळं बाहेरील आवरण मऊ होतं आणि यातून शरीराला त्यातून अधिक पोषण मिळतं.
3) अनेकांना रक्तदाबाची समस्या असते. अशांनी रोज भिजवलेले बदाम खावेत. यामुळं रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.
4) बदलती शैली आणि फास्टफूड खाण्याची सवय यामुळं अनेकजण वाढत्या वजनानं त्रस्त असतात. अशा व्यक्तींनी भिजवलेले बदाम खावेत.
5) बदामात कॅलरीज कमी असल्यानं त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळं पचशक्ती सुधारते. वारंवार लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळतं.
6) लठ्ठपणा वाढण्याचं प्रमुख कारण असलेल्या मेटाबॉलिजम सिंड्रोमवरही नियंत्रण मिळतं.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.