मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ‘रबने बना दी जोडी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तिने १९ चित्रपटात काम केले. त्यातील तीन चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. आतापर्यंत अनुष्काने ‘रबने बना दी जोडी’, ‘पीके’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘झिरो’, ‘सुलतान’ यासारख्या चित्रपटात झळकली आहे. अनुष्का शर्माचा जन्म १ मे १९८८ मध्ये अयोध्या येथे झाला. अभिनेत्री अनुष्का शर्माने २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न केले. अनुष्का आणि विराटचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. अनुष्काने लग्नानंतर एकाही चित्रपटात काम केले नाही तरीदेखील ती २६० कोटींची मालकीण आहे.
अनुष्का शर्माने २०१४ मध्ये मुंबईत खरेदी केलेल्या घराची किंमत जवळपास ९ कोटी रुपये आहे.अनुष्का प्रत्येक चित्रपटासाठी १२ कोटी रुपये आणि प्रत्येक जाहिरातीसाठी ४ कोटी रुपयांचे मानधन घेते. याशिवाय रिअल इस्टेटमध्येही तिने बरीच गुंतवणूक केली आहे. अनुष्काकडे जवळपास ३६ कोटींची संपत्ती आहे. आज ती यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते, इतकेच नाही तर निर्माती देखील बनली आहे. अनुष्का शर्माच्या कार कलेक्शनबाबत बोलायचे झाले तर रेंज रोवल, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या महागड्या कार ब्रँडचा समावेश आहे.