मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- मुंबईत रंगशारदा येथे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राज्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पण राज ठाकरे यावेळी बैठकीत केवळ दहा मिनिटे उपस्थित होते. राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका, तो मान फक्त बाळासाहेबांचा आहे, मी बाळासाहेबांइतका मोठा नाही, अशी ताकीद राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
तसेच शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंड्याचे कुठल्याही प्रकारचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्या, रेल्वे इंजिन असलेला झेंड्याचा वापर करावा. ज्या प्रभागात राजमुद्रा असलेला झेंडा लावण्यात येईल तेथील विभाग अध्यक्षाची ही जबाबदारी असेल. झेंड्याचा अपमान होता कामा नये अशी ताकीद त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी तयारीला लागा, मोठ्या संख्येने यावं अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
राज ठाकरे यांनी तब्येत ठिक नसल्याने ते बैठकीतून अवघ्या दहा मिनिटांत निघून गेले. त्यानंतर पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी बैठकीला संबोधित केल्याचे सांगण्यात येत आहे. तर मोर्चासाठी पोलिसांची परवानगी मागितली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहात असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com