अकोला : बहुजननामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने शरद पवार यांच्यावर जाहीरपणे टीका केली आहे. काँग्रेस सोबत आघाडी करण्यास तयार आहोत, परंतु राष्ट्रवादी सोबत नाही,असे जाहीरपणे सांगत राष्ट्रवादीला धारेवर धरणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आता मात्र शरद पवारांची पाठराखण केलेली दिसत आहे.
शरद पवार यांच्यावर राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज घोळाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) ने केलेल्या कारवाईचा प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार सांगितले कि, शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
परंतु हि चौकशी सूडबुद्धीने होऊ नये. शरद पवार हे कधीही शिखर बँकेचे संचालक किंवा अध्यक्ष नव्हते, त्यामुळे त्यांच्या या घोटाळ्याप्रकणी काहीही संबंध नसेल, त्यामुळे हि चौकशी राजकीय आकसापोटी करू नये, ईडीसारख्या चौकशांचा धाक दाखवत भाजप -शिवसेना विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हि कारवाई निषेधार्थ आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारने लोकशाही मार्गाने जावे, असा सल्लादेखील यात नमूद करण्यात आला.