Diwali 2022 | पुणेकरांनो बिनधास्त तोडा वाहतुकीचे नियम, दिवाळीत 10 दिवस कोणतंही चलान नाही, पालकमंत्र्यांनी दिली माहिती
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यात अगोदरच वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसतो. वाहतुक पोलिस (Traffic Police) असतानाही अनेकजण वाहतुकीचे नियम तोडताना दिसतात. मात्र, आता दिवाळी सणातील (Diwali 2022) पुढील 10 दिवस वाहतुकीचे नियम (Traffic Rules) तोडणार्यांना कोणतेही चलान दिले जणार नाही. या निर्णयामुळे दिवाळी सणाच्या (Diwali 2022) गर्दीच्या काळात समस्या दूर होईल की, वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले की, ट्रॅफिक पोलीस दिवाळीच्या (Diwali 2022) 10 दिवसांत कोणतेही चलान फाडणार नाहीत. नियम तोडणार्या वाहनचालकांना सहसा चलान देण्यात येते, पण त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वाहनांच्या रांगेतून त्या वाहनधारकाला बाजूला घेणे, त्याच्यावर कारवाई करणे या प्रक्रियेत वाहतूक कोंडीही (Traffic Jams) होते. हे टाळण्यासाठी दिवाळीच्या काळात चलान फाडले जाणार नाही, असे पाटील म्हणाले.
दिवसाळीचा सण तोंडावर आला असल्याने खरेदीसाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे
वाहतुक कोंडी झालेली दिसत आहेत. गर्दी चुकवण्यासाठी काही वाहनचालक पर्यायी मार्ग वापरत होते.
यामध्ये वाहतुकीचे नियम पाळले जात नव्हते.
परंतु, गर्दीचे प्रमाण पाहता यंत्रणांनाही कारवाई करणे जवळपास अशक्य वाटत असल्यामुळे अखेर पुढील 10 दिवस
कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला सूचना देताना म्हटले की,
पुण्यात वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यासाठी पुणे मनपा (PMC) आणि पोलीस आयुक्त (Pune CP) अॅक्शन प्लान करत आहेत,
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Diwali 2022 | diwali 2022 no traffic fine or challan for next 10 days amid festive days in pune
हे देखील वाचा :
Shahaji Bapu Patil | मला विधानपरिषदेवर पाठवा, या विधानावरुन शहाजी पाटलांचे घुमजाव
Comments are closed.