अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – मातंग समाजास आरक्षण मिळण्यासाठी केज (जि.बीड) येथील संजय ताकतोडे या युवकाने जलसमाधी घेतली. मातंग समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करुन, जिल्हाधिकारी कार्यालया समोर दलित महासंघ, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समिती प्रतिष्ठान व मातंग समाजाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. मातंग समाजाला अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करुन आरक्षण देण्याची, ताकतोडे या युवकाच्या कुटूंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी मिळण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.