भद्रावती : बहुजननामा ऑनलाइन – येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे भद्रावती नगर परिषदेतील सफाई कामगार , घराघरातून कचरा गोळा करणारे कामगार, शौचालय सफाई करणारे कामगार ह्यांना दिवाळी निमित्त मिठाई व आर्थिक भेट नगर सेवक सुशिल देवगडे यांच्या तर्फे देण्यात आली.
ज्या कामगारांनी कोरोना महामारी मधे आमचं शहर स्वछ ठेवून आम्हाला कोरोना महामारी पासून दूर ठेवले. त्या सर्वांचे आभार मानून त्यांना दीपावली च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ह्या प्रसंगी राज्य महासचिव कुशलभाऊ मेश्राम, सुशीलभाऊ देवगडे, सुनीलभाऊ खोब्रागड़े, राहुलभाऊचौधरी, राखी रामटेके, सीमाताई ढेंगळे (सर्व नगरसेवक)विजुभाऊ इंगोले, कपुरदास दुपारे, संध्याताई पेटकर, विशाल कांबळे, संजय पाटिल, अजय पाटिल, राजू लभाने, विजय पाटिल हजर होते.