औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद शहराचा निकाल धक्कादायक लागला सगळ्यांचे अंदाच चुकवत औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते इम्तियाज जलील हे निवडून आले नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरुन औरंगाबादेत वाद चांगलाच झाला आहे.यामध्ये MIM च्या २० नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे , MIM चे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला काही नगरसेवकांकडून विरोध करण्यात आला त्यावरुन एमआयएम नगरसेवकामध्ये प्रचंड गदारोळ केला. याप्रकरणी एमआयएमच्या २० नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे.नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर सभा तहकूब करण्यात आली आहे. झालेला प्रकार आटोक्यात आणण्यासाठी सभागृहात पोलीस दाखल झाले होते.
एमआयएमचे नगरसेवक सभापतींच्या आसणासमोर ठाण मांडून बसले होते त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन करण्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले .महापौर सत्तेची दुरुपयोग करत असून जातीवाद करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.