मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत NDA प्रणित भाजप सरकारला घवघवीत यश मिळाले आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तयारी आधीच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख तथा पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आणि पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार यांच्यातील शितयुद्ध सुरु असल्याचे समोर आलंय सचिवांनी केलेल्या ६६ अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या विश्वासात न घेता केल्यामुळे त्या मंत्री महादेव जानकर यांनी रद्द केल्या आहेत.
सचिवांच्या आदेशानंतर कोकण विभागातील १४ विदर्भातील ३७ पशुधन विकास अधिकारी तसंच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन दर्जाच्या १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यासंदर्भात ३१ मे २०१९ रोजी आदेश काढण्यात आला . या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावं. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर हजर झाल्यानंतर लगेचच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रासह रुजू अहवाल पशुसंवर्धन आयुक्तांकडे द्यावा, असं आदेशात म्हटलं होतं.
बदल्यासंदर्भात काही अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणाबाबत नाराजी व्यक्त केली. तसंच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडे तक्रार ही केली. परंतु या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याचं सांगितलं. सचिव स्तरावरुन बदल्या झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रक्रियेला स्थगिती दिली.