बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस दिशा पाटनी (Disha Patani) आपल्या बोल्ड अवतारामुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येताना दिसत असते. कधी दिशा तिच्या वर्कआउटच्या फोटोंमुळं किंवा व्हिडीओंमुळंही चर्चेत येताना दिसत असते तर कधी हॉट लुक किंवा बोल्ड फोटोशुट. आज तिच्या काही फोटोंमुळं दिशा प्रचंड ट्रोल झाली आहे. ट्रोलर्सनी तिची तुलना थेट आमिर खानसोबत केली आहे.
दिशानं तिच्या ट्विटरवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दिशानं अॅनिमल प्रिंटचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिनं दिलेले हावभाव मात्र काहींना खटकल्याचं दिसत आहे. यामुळंच ती ट्रोल झाली आहे.
https://twitter.com/DishPatani/status/1372100309175078914?s=20
एकानं आमिर खानचा महिलेच्या वेशातील फोटो शेअर करत लिहिलं की, तुझ्यापेक्षा हा जास्त सुंदर दिसत आहे. काहींनी तिच्या हावभावांची खिल्ली उडवली आहे.
App se zyada sundaar yeh hai pic.twitter.com/4ltlZksZvw
— Bruce (@Iambruce_) March 17, 2021
एकानं लिहिलं की, तुझ्याकडून कोणी जबरदस्तीनं हे फोटो शुट करून घेतले आहेत का. एकानं तर थेट विचारलं की, प्रत्येक फोटोत तू इतकी तणावात आणि घाबरलेली का दिसतेस. थोड हसत जा असा सल्लाही त्यानं दिला आहे. काहींनी तर अनेक मजेदार कमेंट केल्या आहेत. कुणी तिला मेकअपवरूनही बोललं आहे.
aree aise kesa shoot kiya jese lg raha ki jabardasti ki ho..pic m reactions thk na h
— AKKI (@AKKI70229691) March 17, 2021
https://twitter.com/indian_azaad/status/1372140626536361990?s=20
दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे. याशिवाय ती एकता कपूरच्या केटीना आणि रणबीर कपूरच्या लव रंजन या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.
didi thoda zyada editing aur makeup nahi ho gaya
— Devaj (@devajgupta) March 17, 2021