आंबेगाव : बहुजननामा ऑनलाईन – आंबेगाव विधानसभा मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील विजयी झाले आहेत. सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यंदा सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी ६६,३५९ मतांनी शिवसेनेच्या राजाराम बाणखेले यांच्यावर विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासूनच वळसे-पाटील आघाडीवर होते.
राजाराम बाणखेले हे आंबेगाव पंचायत समितीचे अपक्ष सदस्य आहेत. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली होती. आक्रमक प्रचारामुळे ते चर्चेत आले होते. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे ओळखला जातो. १९९० पासून ते आतापर्यंत दिलीप वळसे पाटील हेच आंबेगावचे आमदार आहेत.आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच सहकारी संस्थांवर दिलीप वळसे-पाटील यांचे वर्चस्व आहे.
Visit : bahujannama.com