बहुजननामा ऑनलाइन टीम – शरद पवारसाहेब वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असा त्रिवेणी संगम लाभलेले लोकनेते आहेत. जनसामान्यांचे कल्याण त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू असून समाजाशी निगडित सर्व क्षेत्रात त्यांचा वावर आहे. राष्ट्रीय पातळीवरील अनुभव आणि कृषी, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण व सहकार क्षेत्राची त्यांना खडान््खडा माहिती आहे. शरद पवार साहेब खऱ्या अर्थाने असामान्य योद्धे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी केले.
रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे व अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर आयोजित 22 व 23 डिसेंबर रोजी झालेल्या ऑनलाईन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय योद्धा @80 वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण महात्मा फुले स्मारक वानवडी करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार अॅड राम कांडगे, संस्थेचे सहसचिव संजय नागपुरे, सदाशिवबापू सातव, बाळासाहेब बेंडे, रूपाली चाकणकर, डॉ. दिगंबर दुर्गाडे, प्रा. राजाराम बाणखेले, झाकीरखान पठाण, बाळासाहेब बाणखेले, उदय पाटील, प्रल्हाद बाणखेले, प्राचार्य के. जी. कानडे, प्राचार्य ए.डी. आंधळे, प्राचार्य पांडूरंग गायकवाड, प्राचार्य सी.जे.खिलारे, चंद्रकांत वाव्हळ , प्राचार्य उत्तमराव आवारी, विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, शंकर पवार उपस्थित होते.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, शरद पवारसाहेब हे राजकारण आणि समाजकारणातील दीपस्तंभ असून जनसामान्यांचे ते आधारस्तंभ आहेत. पवारसाहेबांसाठी जनतेचे प्रेम हीच शक्ती आणि हाती घेतलेल्या जनविकासाच्या कार्यावर भक्ती हा कानमंत्र आहे, असे प्रतिपादन केले.
सुकन्या यादव सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड ही मुलींतून प्रथम, तर शुभम रंगराव पाटील इंजिनिअरींग कॉलेज पुणे हा मुलांतून प्रथम आला. सांघिक स्पर्धेत शरद रयत चषक एस. एम. जोशी कॉलेजच्या शुभम शेंडे व सिद्धेश कायगुडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विभागीय चेअरमन अॅड. राम कांडगे यांनी केले. प्रतापराव गायकवाड आणि रूपाली सोनावळे यांनी सूत्रसंचालन केले.
Online inter-college state level warrior award distribution, Dilip Walse Patil said – ‘Sharad Pawar is an extraordinary warrior’
ऑनलाइन आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय योद्धा पुरस्कार वितरण, दिलीप वळसे पाटील म्हणाले – ‘शरद पवार हे असामान्य योद्धा’