खासगी सचिव बाबासाहेब शिंदे (Private Secretary Babasaheb Shinde) हे फलटणमध्ये धुळदेव इथं 10 डिसेंबर रोजी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर शिंदे हे परतीच्या प्रवासाला निघाले होते. दरम्यान, कारची काच फोडल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कारची पाहणी केली असता एक बॅग आणि रोख रक्कम कुणी तरी चोरी केल्याचे लक्षात आले. चोरीला गेलेल्या बॅगेत महत्त्वाची कागदपत्रे होती, अशी माहिती समजतेय.
दरम्यान, चोरी झाल्याचे लक्षात येता खासगी सचिव शिंदे यांनी तातडीने फलटण शहर पोलीस ठाण्यात (Phaltan City Police Station) तक्रार केली. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या (Dilip Walse Patil) सचिवाची बॅग चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी आता पोलिस शोध घेत आहेत.
Web Title :- Dilip Walse Patil | home minister dilip walse patils secretary balasaheb shindes bag stolen from the car at faltan of satara district
Prashant Kishor | ‘पंतप्रधान मोदी सर्वांचे ऐकतात हीच त्यांची खरी ताकद’ – रणनीतीकार प्रशांत किशोर
Ileana D’Cruz | इलियाननं शेअर केले बोल्ड फोटो, कॅप्शनमध्ये हेटर्ससाठी लिहिला खास संदेश…
Nora Fatehi Oops Moment | कारमधून उतरताना नोरा फतेहीचा टॉप आला खाली, झाली Oops Moment ची शिकार…!
Kolhapur Crime | धक्कादायक ! 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीनं राहत्या घरात घेतला गळफास