मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Dilip Kumar | ‘ट्रॅजेडी किंग’ असं बिरुद मिरवणाऱ्या दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि दिलीप कुमार या जोडीकडे पाहिलं कि प्रेमाचा अर्थ उलगडतो. एव्हरग्रीन कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जाते. दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची प्रकृती ठीक नव्हती अशा परिस्थितीही सायरा बानो (Saira Banu) यांनी खंबीरपणे त्यांची साथ दिली. केवळ साथच नाही तर या नात्यातील प्रेम, जिव्हाळा शेवटपर्यंत टिकून राहावा यासाठी प्रयत्न केलं. हे सर्वांनीच पाहिलं आहे. आता दिलीप कुमार- सायरा बानो एकमेकांपासून दुरावले असून त्यांच्या प्रेमाविषयी, त्यांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. एवढेच नाही तर आयुष्यभर त्यांना एक उणीव भासत राहिली अशीही चर्चा सुरु आहे.
दिलीप कुमार व सायरा बानो यांना मूलबाळ काहीच नव्हतं हे सगळ्यांनाच ठावूक आहे. आणि हीच उणीव त्यांना सतत भासत राहिली. या मागील कारणही कमी लोकांचं माहित आहे. ‘द सबस्टान्स अँड द शॅडो’(The Substance and the Shadow)मध्ये या आत्मचरित्रा(Autobiography)त दिलीप कुमार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हंटले आहे की, सायरा पहिल्यांदा गरोदर होत्या. आठ महिने पूर्ण झाल्यानंतर सायरा यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. तर त्यावेळी पोटातील बाळाची वाढ जवळपास पूर्ण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सायरा बानो कधीही आई बनू शकल्या नाहीत.
दिलीप कुमार-सायरा बानो यांची लव्हस्टोरी (Dilip Kumar-Saira Banu Love Story)
‘आन’ या चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या अभिनयाने विनोदी अभिनेत्री नसीम बानू यांची कन्या सायरा प्रभावित झाल्या. ‘मुघल-ए-आझम’(‘Mughal-e-Azam)च्या प्रिमिअर दरम्यान दिलीप कुमार अनुपस्थित होते.
विशेष म्हणजे हा चित्रपट त्याकाळी ब्लॉकबस्टर पैकी एक होता. त्यांची अनुपस्थिती सायरा यांच्या
चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यानंतर एका मुलाखती दरम्यान सायरा बानू या दिलीप कुमार यांना
भेटल्या. त्यावेळी दिलीप कुमार यांनी सायराला सुंदर मुलगी असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी दिलीप कुमार यांच्याशीच आपला विवाह होईल असे सायरांना मनात खोलवर वाटले होते.