बहुजननामा ऑनलाइन टीम – लॉजच्या पुस्तकात एंट्री करण्यास सांगितल्याचा राग आल्याने लॉजमधील तरुणाला ‘आम्ही या भागातील भाई (Dighi News)आहे’ असे म्हणत दोघांनी बेदम मारहाण केली. तसेच तरुणाच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून लॉजमधील साहित्याची तोडफोड केली. हा प्रकार बुधवारी (दि.6) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडमुखवाडी येथील गंधर्व लॉजमध्ये घडला.
साहिल शहा (वय-23 रा. गजानन महाराज नगर, दिघी), शुभम तरटे (वय-22 रा. काटे कॉलनी नं. 1, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी रामेश्वर जीवन घोडके (वय-25 रा. माऊली नगर, आळंदी रोड, वडमुखवाडी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी येथील गंधर्व लॉजमध्ये आरोपी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आले. फिर्यादी यांनी आरोपींना लॉजच्या पुस्तकात एंट्री करण्यास सांगितले. त्याा राग आल्याने आरोपींनी तू आम्हाला ओळखल नाही का, तुला लय माज आलाय का, थांब तुला दाखवतो असे म्हणत लॉजमधील सामानाची तोडफोड केली. तसेच आम्ही या भागातील भाई आहे, कोठे तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन निघून गेले. फिर्यादी यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खंटाळ करीत आहेत.