Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?

Diabetes | how to reduce risk of diabetes lifestyle habits you must change to reduce risk of diabetes

बहुजननामा ऑनलाइन टीम – Diabetes | जगात तसेच देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही अहवाल असे सुचवतात की भारतातील प्रत्येक 1000 लोकांपैकी 171.3 लोकांना मधुमेह आहे. मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण चुकीची जीवनशैली असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. टाइप 1 मधुमेह अनुवांशिक आहे आणि तो फक्त एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाऊ शकतो. दुसरीकडे, टाइप 2 मधुमेह हा खराब आहार आणि जीवनशैलीमुळे होतो. जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी सुधारून मधुमेह टाळता येतो. येथे आम्ही तुम्हाला अशा 6 सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो आणि त्या त्वरित दुरुस्त कराव्यात. (Diabetes)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

1. न्यूट्रिशनची कमतरता (Nutritional Deficiency)
जर एखाद्याच्या शरीरात न्यूट्रिशनची कमतरता असेल तर मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्युट्रिएंटच्या कमतरतेमुळे अनेक आजार होतात, त्याचप्रमाणे मधुमेहाची तक्रार देखील होऊ शकते. संशोधन सांगते की जे लोक निरोगी अन्न, शाकाहारी आहार आणि पालेभाज्या घेत नाहीत त्यांना मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.

 

याशिवाय दीर्घकाळापर्यंत व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट आणि कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्यास इंसुलिनची पातळी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

 

2. व्यायाम न करणे (Not Exercising)
संशोधनानुसार, व्यायाम केल्याने शरीराची श्वसन प्रणाली बरोबर राहते, परंतु जर कुटुंबात एखाद्याला अनुवांशिक मधुमेह असेल तर व्यायाम केल्याने त्याचा धोका कमी होऊ शकतो. (Diabetes)

 

अनुवांशिक मधुमेह असलेल्यांना मधुमेहाची लक्षणे उशिरा दिसतात आणि रक्तातील साखरही नियंत्रणात असते. असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीने किमान 150 मिनिटे किंवा आठवड्यातून पाच दिवस व्यायाम केला पाहिजे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

3. बैठी जीवनशैली (Sedantry Lifestyle)
बैठी जीवनशैली हे मधुमेहाचे सर्वात मोठे कारण आहे. जे लोक सक्रिय नसतात, बहुतेक वेळा झोपतात, त्यांना मधुमेहाची तक्रार असू शकते. डॉक्टर सांगतात की जे लोक दीर्घकाळ निष्क्रिय असतात त्यांना हृदय आणि फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. काही संशोधने सांगतात की जे लोक दिवसभर बसतात किंवा झोपतात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दिवसभर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा.

 

4. हाय कॅलरी डाएट (High Calorie Diet)
हाय कॅलरी डाएट घेतल्यास टाइप 2 मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने फक्त तेवढ्याच कॅलरीज घ्याव्यात जितक्या तो बर्न करतो. प्रत्येक व्यक्तीने लॉ कॅलरी डाएट घ्यावे आणि त्यात फक्त आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करावा.

 

5. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग (Smoking and drinking)
हृदयविकार, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार स्मोकिंग आणि ड्रिंकिंगमुळे होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
खरं तर, धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्याचा रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
स्मोकिंग आणि ड्रिंकिंग केल्याने फॅटी लिव्हर डिसीज होतो, ज्यामुळे शेवटी मधुमेह होतो.

 

6. लठ्ठपणा (Obesity)
डॉक्टरांनी असा इशारा दिला आहे की ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना मधुमेहाचा धोका जास्त असतो.
त्यामुळे बीएमआय नेहमी विहित मर्यादेत ठेवा जेणेकरून मधुमेहाचा धोका टाळता येईल.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | how to reduce risk of diabetes lifestyle habits you must change to reduce risk of diabetes

 

हे देखील वाचा :

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य उद्या ठरणार, सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

Pune Crime | कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुबाडले; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

Ashish Shelar | खडसे-अमित शाह यांच्या भेटीवर आशिष शेलारांचे मोठे विधान, म्हणाले… (व्हिडिओ)