नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Diabetes | डायबिटीज (Diabetes) एक असा आजार (disease) आहे जो एकदा झाला की कायमसाठी राहतो. धोका टाळण्यासाठी डायबिटीजच्या रूग्णांना नियमितपणे ब्लड शुगर (blood sugar) चेक करण्याचा सल्ला दिला जातो. शुगर लेव्हल (sugar levels) वाढल्यास हृदय, स्ट्रोक, किडनीचा आजार (heart, stroke, kidney disease) आणि डोळ्यांशी संबंधीत समस्या (eye problems) वाढतात. काही नैसर्गिक उपचारांनी सुद्धा डायबिटीज नियंत्रित (control diabetes) करता येऊ शकतो. जाणून घेवूयात…
कडूलिंब –
कडूलिंबातील फ्लेवोनॉईड्स, ग्लायकोसाईड आणि ट्रायटरपेनोइड्स नावाचे केमिकल शरीरात ग्लूकोज वाढू देत नाही.
डॉक्टर सांगतात दोन वेळा कडूलिंबाची पावडर पाण्यासोबत घेतल्यास लाभ होतो.
चहामध्ये मिसळून सुद्धा घेऊ शकता.
कारले –
कारल्यामधील चारटिन आणि मोमोर्डिसिन ब्लड शुगरचा स्तर कमी करण्यास मदत करते.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सकाळी-सकाळी कारल्याचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर सहज कंट्रोल होऊ शकते. यामध्ये आवळा सुद्धा टाकू शकता.
आले –
आले नियमित सेवन केल्याने इन्सुलिन नियंत्रित राहते.
जांभुळ –
डायबिटीजवर जांभुळ हे जादुई फळ आहे. हे ब्लड शुगर नियंत्रित करते.
यातील जॅम्बोलिन कंपाऊंड ब्लड शुगर कमी करते. इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते.
बिघडलेले फास्टिंग ग्लूकोज सुद्धा सुधारते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मेथी –
मेथी शरीरात ग्लूकोज टॉलरन्स चांगले करते. यातील विरघळणारे फायबर कार्बोहाइड्रेटचे अवशोषण आणि पचन संथ करून ब्लड शुगर कंट्रोल करते.
रोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केल्याने डायबिटीजच्या समस्या कमी होऊ शकतात.
मेथी पावडर किंवा पाण्यात उकळवून घेऊ शकता.
दालचीनी –
दालचीनी इंसुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते. शरीर चांगल्याप्रकारे इन्सुलिनचा वापर करू शकते.
डॉक्टर दिवसात दोन वेळा 250 मिलीग्रॅम दालचीनी घेण्याचा सल्ला देतात.
खाण्यापूर्वी हे घेणे लाभदायक ठरते.
जिनसेंग –
हे एका वनस्पतीचे मुळे आहे जे प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत उगवले जाते. इन्सुलिन सुधारण्यात हे खुप उपयोगी मानले जाते. जांभुळ आणि मेथीप्रमाणे हे सुद्धा शरीराच्या पेशींना इन्सुलिनसाठी सक्रिय बनवते. डॉक्टर्स हे रोज 3 ग्रॅम घेण्याचा सल्ला देतात. मात्र ब्लड थिनर घेणार्यांना याचा कोणताही खास लाभ मिळू शकत नाही.
Web Title : Diabetes amazing foods to control your blood sugar levels.
Union Minister Narayan Rane | ‘एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, BJP मध्ये आले तर स्वागतच’
Viagra Side Effects | कानाने ऐकू येणे बंद, उलटी-कंबरदुखी, वियाग्राच्या साईड इफेक्टने वाढल्या अडचणी
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी