धुळे : बहुजननामा ऑनलाइन – Dhule Soldier Manohar Patil Martyred In Siachen | धुळ्याचे सुपुत्र भारतीय सैन्य दलाचे जवान मनोहर पाटील हे सियाचीन भागात ऑपरेशन मेघदूतमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. ते धुळे तालुक्यातील न्याहळोद गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती धुळे जिल्हा प्रशासनाने दिली. जवान मनोहर पाटील यांच्या पश्चात पत्नी मायाबाई पाटील तसेच 9 वर्षाची मुलगी, आई, वडील व 4 भाऊ असा परिवार आहे. (Dhule Soldier Manohar Patil Martyred In Siachen)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सेनादलात 2002 मध्ये भरती झालेले मनोहर रामचंद्र पाटील (42) हे हवालदार पदावर कार्यरत होते. सध्या ते फिल्ड वर्कशॉप येथे भारतीय सैन्यात अतिथंड अशा सियाचिन ग्लेशियर येथे ऑपरेशन मेघदूतमध्ये कर्तव्यावर होते. देश सेवा बजावत असताना 16 जुलै रोजी तेथील हवामानामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या गोठल्या गेल्याने त्यांना तीव्र डोकेदुखी आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली.
जवान मनोहर पाटील यांचे पार्थिव आज हवाई मार्गाने पुणे विमानतळावर आणण्यात येईल.
येथून शासकीय रुग्णवाहिकेद्वारे धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जवान मनोहर पाटील शहीद झाल्याचे वृत्त समजताच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी शोक व्यक्त केला.
Web Title :- Dhule Soldier Manohar Patil Martyred In Siachen | Dhule Soldier Manohar Patil Martyred In Siachen
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | घरात घुसून शिवीगाळ करत महिलेसह दोन मुलींचा विनयभंग; निगडी परिसरातील घटना
Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार