बहुजननामा ऑनलाईन टीम – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माचे चाहते आमने-सामने आल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड याठिकाणी घडली. त्यातूनच झालेल्या वादात एकाला उसाच्या मळ्यात नेऊन बडविले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कुरुंदवाड याठिकाणी माहीच्या कौतुकाचे होर्डिंग्ज चाहत्यांकडून लावण्यात आले होते.
त्यानंतर लगेच रोहित शर्माला खेल रत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कुरुंदवाड शहरात त्याच्या अभिनंदनाचे होर्डिंग लावले होते. रोहित शर्माच्या अभिनंदनाचे लावलेल्या होर्डिंग्जची अज्ञाताने फाडाफाडी केली. त्यामुळे या चाहत्यांच्या गटातील धुसफूस आणखी वाढली. होर्डींग्ज फाडाफाडी केल्याचा कारणावरून रोहित शर्माचा फॅन असलेल्या तरुणाने राग व्यक्त करत शिवीगाळ करायला सुरुवात केली.
त्यानंतर शिवीगाळ करणार्या चाहत्याला उसाच्या मळ्यात नेऊन चोप दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात मारहाणीची अजून तक्रार आली नाही. मात्र संबधित होर्डिंग्ज पालिकेला सांगून काढण्यात आली असल्याची माहिती कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे यांनी दिली आहे.