बहुजननामा ऑनलाईन – Dhondi Champya Trailer | नुकताच ‘धोंडी चंप्या : एक प्रेम कथा’ या मराठी चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात म्हशीची म्हणजेच धोंडीची आणि रेड्याची म्हणजेच चंप्याची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांनी केले आहे. या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण असे तगडे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात धोंडी चंप्याच्या प्रेमकहाणीबरोबरच ओवी-आदित्यची प्रेमकहाणीही खुलताना दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना प्रेमकहाणीचा डबल तडका अनुभवता येणार आहे. (Dhondi Champya Trailer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आपण एका मुला-मुलीची प्रेम कथा तर नेहमीच बघत आलो आहोत, परंतु या चित्रपटात एका रेडा आणि म्हशीची म्हणजे धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या कहाणीबरोबरच सायली आणि निखिलची म्हणजेच ओवी तसेच आदित्यची प्रेककहाणी फुलताना दिसणार आहे. या सगळ्यांच्या प्रेमात अंकुश आणि उमाजी, म्हणजे भरत जाधव आणि वैभव मांगले यांचा अडथळा येत आहे. हे दोघं एकाच गावचे असून दोघांमध्ये कसलं तरी शत्रुत्व असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे त्यांचे खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे आता धोंडी-चंप्या आणि ओवी-आदित्य यांची प्रेमकहाणी किती यशस्वी होते हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. (Dhondi Champya Trailer)
या चित्रपटाच्या निमित्ताने भरत जाधव, वैभव मांगले हे हास्यसम्राट एकत्र आले आहेत.
रिलायन्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने,
फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित ‘धोंडी चंप्या : एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रभाकर भोगले
यांच्या कथेपासून प्रेरित होऊन बनवण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर
आणि सागर केसरकर यांनी लिहिले आहे. सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री यांनी
या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
येत्या १६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Dhondi Champya Trailer | dhondi champya trailer release bharat jadhav vaibhav magale comedy film
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | कंपनीची फ्रॅन्चायजीच्या बहाण्याने एक कोटीची फसवणूक; दोन संचालकांवर FIR
Nana Patekar | ‘हे फक्त नितीन गडकरीच करू शकतात’ – नाना पाटेकर
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आता थेट संवाद साधा
TikTok Star Megha Thakur | टिक टॉक स्टार मेघा ठाकूरचं 21 व्या वर्षी निधन