बीड बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर सगळीच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत.त्यातच बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या परळी मतदारसंघातून भाजपच्या वतीने पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार आहेत. परंतु दोन्ही प्रस्थापित पक्षांना शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून संजय पंडितराव दौंड यांची चर्चा सुरु आहे.
बीडमधील परळी हा मतदार संघ सर्वात जास्त चर्चेत असलेला मतदार संघ या मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन्ही बड्या नेत्यांना शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून संजय पंडितराव दौंड यांच्या नावाची चर्चा आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दौंड यांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरु केल्या आहेत. ३० वर्षांनंतरही मुंडेंची मजबूत पकड असणारा परळी मतदारसंघात वंंचित बहुजन आघाडीने संजय दौंड यांच्या नावाची चर्चा असल्याने ही लढत अत्यंत रंजक ठरणार आहे.
गेली ३० वर्षे पंडितराव दौंड किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीच विधानसभेच्या मैदानात उतरले नाहीत. दौंड यांच्यासोबतच टी. पी. मुंडे, फुलचंदराव कराड यांचीही उमेदवारी असू शकते.