• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Dhananjay Mundhe : ‘त्या’ आरोपांनंतर धनंजय मुंडे म्हणाले…

by sajda
January 13, 2021
in राजकारण
0
Munde

Munde

बहुजननामा ऑनलाइन टीम –  कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Mundhe) यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका नातेवाईक महिलेने केला आहे. या संदर्भात या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली. त्यानंतर धनंजय मुंडे(Dhananjay Mundhe) यांनी आपली बाजू मांडत याबाबत खुलासा करताना म्हटले की, माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आपला सविस्तर खुलासा पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मुंडे यांनी कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत. या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केले आहे.

करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना माहित होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले आहे. तसंच स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची आई असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत. मात्र, २०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. याबाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मे २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.

या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे.

कालपासून रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत, त्यांनी माझ्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्याकडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे. माझ्याकडे रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईलवरून मला ब्लॅंकमेलिंग करत कोट्यवधी रुपये मागितल्याचे एसएसमसरुपी पुरावे आहेत. तसेच मी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो. तसेच पुढे ते म्हणाले, माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की, या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे.

Tags: Dhananjay Mundheधनंजय मुंडेब्लॅकमेलसोशल मीडिया
Previous Post

डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवायचीत ? जाणून घ्या ‘हे’ 6 सोपे घरगुती उपाय

Next Post

जाणून घ्या गुळाच्या सेवनाचे ‘हे’ 8 गुणकारी फायदे !

Next Post
Jaggery

जाणून घ्या गुळाच्या सेवनाचे 'हे' 8 गुणकारी फायदे !

Please login to join discussion
Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Munde
राजकारण

Dhananjay Mundhe : ‘त्या’ आरोपांनंतर धनंजय मुंडे म्हणाले…

January 13, 2021
0

...

Read more

टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण ! आता मयांक आणि अश्विन जायबंदी, भारतीय संघाच्या अडचणीत भर

5 days ago

Ind Vs Aus : शार्दुल ठाकूरचा पर्दापणातच विक्रम; पहिल्याच चेंडुवर घेतला बळी

2 days ago

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

13 hours ago

PFC NCD issue : सरकारी कंपनी देतीय दीर्घ मुदतीपर्यंत चांगल्या कमाईची ‘संधी’, जाणून घ्या सब्सक्रिप्शनसह इतर माहिती

2 days ago

Pune News : बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने भरारी पथके तयार, व्यावसायिकांनी सहकार्य करावे – CEO आयुष प्रसाद

5 days ago

Corona Vaccination : आज PM मोदी करणार जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण अभियानाची सुरूवात, बनवण्यात आली 3006 केंद्र

18 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat