DGP Sanjay Pandey | 190 सहाय्यक निरीक्षकांना (API) पोलिस निरीक्षकपदी (PI) बढती लवकरच, DGP संजय पांडे यांची Facebook Live मध्ये माहिती (व्हिडिओ)
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात काही पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबतचे लवकरच आदेश निघणार आहेत. पोलीस महासंचालक पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी पोलीस दलातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष म्हणजे आज राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी फेसबुक लाईव्ह (facebook live) माध्यमातून राज्यातील अनेक पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिले. याच दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक (assistant police inspector – API) ते पोलीस निरीक्षक (Police Inspector – PI) बदल्यांसंदर्भात विचालेल्या प्रश्नाला पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उत्तर देताना लवकरच प्रमोशन ऑर्डर निघेल असे सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस महासंचालक संजय पांडे यांना API ते PI किती पदे भरली जातील असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, API ते PI कमीत कमी 190 जणांना प्रमोशन मिळणार आहे. 190 पोलिस निरीक्षकांचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) प्रमोशन होणार आहे. त्याची ऑर्डर येत्या 10 दिवसांत निघेल असे त्यांनी सांगितले. तसेच नवीन भरती संदर्भात बोलताना 12 हजार जणांची भरती केली जाणार असल्याचे सांगितले.
याच दरम्यान पोलिसांच्या 12-12 तास ड्युटीच्या प्रश्नावर देखील मार्ग काढत असल्याची माहिती त्यांनी दिली.
संजय पांडे म्हणाले, पोलिसांनी 12 तास ड्युटी केल्यानंतर त्यांना 24 तास आराम मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
तसेच फेसबुक लाईव्ह माध्यमातून एका पोलिसाने 2011 च्या सागरी पीएसआय (PSI) बॅचच्या प्रमोशनची विनंती प्रलंबित असल्याची विचारणा केली.
त्यावर पांडे यांनी संबंधित पोलीस अधीक्षक (SP) यांच्याकडून माहिती घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली.
संजय पांडे हे आठवड्यातून एकदा पोलीस दलातील प्रत्येक पोलिसांपर्यंत आणि जनसामान्यांना आपल्या कामाचा लेखाजोखा फेसबुकच्या माध्यमातून देत असतात.
त्यामुळे पोलीस दलाबरोबरच इतर नागरिकांकडून त्यांची प्रशंसा केली जात आहे.
आज त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील पोलिसांसोबत संवाद साधला.
या फेसबुक लाईव्हला 6 हजार लाईक्स तर 17 हजार कमेंट्स आल्यात आहेत तर 79 जणांनी शेअर केले आहे.
Web Title :- DGP Sanjay Pandey | 190 Assistant Inspectors APIs promoted as Police Inspectors PIs soon DGP Sanjay Pandeys information in Facebook Live Video
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील? उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना Live Video
Comments are closed.