श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरचे कारागृह पोलीस महासंचालक (Director General of Jail Police) व्ही के सिंह यांनी म्हटलं की, कैद्यांकडे लवकरच कैदी कॉलिंग सुविधा असेल. ज्यामुळे ते आपले नातेवाईक आणि वकिलांशी बोलू शकतील.
जम्मूमधील कारागृह अधीक्षकांच्या परिषदेला बुधवारी संबोधित करताना सिंह म्हणाले, “या सुविधेचा लाभ त्या कैंदांना नाही मिळणार जे गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये आहेत किंवा जे जेलमध्ये गैरवर्तन करतात.”
निवडक दिवशी 2 नातेवाईकाशी बोलू शकतील कैदी
व्ही की सिंह म्हणाले की, “कैदी कॉलिंग, कैंद्रीय कारागृह, श्रीनगर आणि कोटभलवाल जम्मू व्यतिरीक्त स्थानिक जिल्हा कारागृहामध्ये सुरु होईल. या प्रणाली अंतर्गत कैदी निवडक दिवशी आपल्या दोन जवळच्या नातेवाईकांशी 5 मिनिट बोलू शकतील.
भेटीच्या ठिकाणीही केली जाणार सुधारणा
व्ही के सिंह यांनी सांगितले की, विभागीय कारागृहात केबिन आणि चाईल्ड फ्रेंडली कॉर्नर बनवून भेटण्याच्या ठिकाणांमध्येही सुधारणा केली जात आहे. कारागृहातील कर्मचाऱ्यांचे कल्याण, प्रशिक्षण आणि विकासावर लक्ष केंद्रीत केले जात आहे.”
क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांवरही भर
व्ही के सिंह म्हणाले की, “कैद्यांना क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय त्यांना इतरही अनेक गोष्टींची ट्रेनिंग दिली जात आहे. जम्मूच्या जिल्हा कारागृहात 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त केले जाणार आहे.”
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी