बहुजननामा ऑनलाईन – नागरी उड्डयन संचालनालयाने (DGCA) आता उड्डाण करणाऱ्या प्रवाश्यांसाठी नवीन SOP जारी केल्या आहेत. डीजीसीएने सूचना केली की, विमानात प्रवास करताना प्रवाशांना कोविड -19 प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे ज्यात मास्क घालणे आणि सामाजिक अंतर ठेवणे समाविष्ट आहे. प्रवाश्यांनी या नियमांचे पालन न केल्यास सुरक्षा यंत्रणांना नियुक्त केले जाऊ शकते आणि इशारा दिल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. जाणून घेऊया नवीन नियम :
1. हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांना नेहमीच मास्क घालणे अनिवार्य असेल आणि सामाजिक अंतरांचे निकष पाळले पाहिजेत. मास्क अपवादात्मक परिस्थितीशिवाय नाकाच्या खाली जाऊ नये.
2. विमानतळ प्रवेशावर तैनात असलेले पोलिस कर्मचारी किंवा सीआयएसएफ कर्मचारी मास्क घातल्याशिवाय कोणालाही विमानतळावर प्रवेश मिळणार नाही, याची खात्री करुन घेतील. सीएएसओ आणि अन्य पर्यवेक्षी अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या याची खात्री करुन घ्यावी.
3. विमानतळ संचालक / टर्मिनल मॅनेजर विमानतळाच्या आवारात प्रवाशांनी व्यवस्थित मास्क घालावेत व सामाजिक अंतर कायम राखतील याची काळजी घ्यावी.
4. जर कोणताही प्रवासी कोविड -19 प्रोटोकॉलचे अनुसरण करीत नसेल तर त्याला इशारा दिल्यानंतर सुरक्षा एजन्सीच्या स्वाधीन केले जाईल.
5. विमानात, जर एखाद्या प्रवाश्याने वारंवार चेतावणी देऊनही मास्क योग्यप्रकारे घातला नसेल तर त्याला टेक-ऑफ करण्यापूर्वी डी-बोर्डर्ड केले जाईल.
6. वारंवार चेतावणी दिल्यानंतरही विमानातील कोणत्याही प्रवाशाने मास्क घालण्यास नकार दिला किंवा कोविड – 19 प्रोटोकॉलचे उल्लंघन केले तर अशा प्रवाशाला ‘Unruly Passenger’ च्या श्रेणीत टाकले जाईल आणि संबंधित एअरलाइन्स निश्चित केेेलेल्या नियमांनुसार प्रवाश्याला ट्रीट करतील.