Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, त्यामुळे आपलेच सरकार येईल’, फडणवीसांचे पदाधिकारी मेळाव्यात वक्तव्य; म्हणाले – ‘अतिआत्मविश्वास ठेवू नका अन् गाफील राहू नका’

October 2, 2024

मुंबई: Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात बोलताना सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत. राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त जनता ही सरकारी योजनांची लाभार्थी आहे. त्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) पुन्हा येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी व हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत. त्यामुळे राज्यात आपलेच सरकार येईल, अशी परिस्थिती आहे. पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अति आत्मविश्वास ठेवू नका किंवा गाफील राहू नका, असा सल्लाही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.