पुणे : बहुजननामा ऑनलाईन – रामनवमीपासून (Ramanavami) देशातील अनेक भागात जातीय हिंसाचाराच्या (Communal Violence) घटना घडल्या आहेत. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) दंगली पेटवल्याचा आरोप केला आहे. त्या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोचऱ्या शब्दात उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांना काही काम धंदा नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पुण्यात (Pune) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis On Sanjay Raut)
सिंपथीमुळे काँग्रेस विजयी
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North By-Election 2022) निकालाबाबत भाष्य केले. निवडणुकीत आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. आम्ही एकटे लढूनही आमच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली. आमच्या विरोधात तीन पक्ष एकत्र होते. तरी देखील त्यांची मते वाढली नाहीत. कोल्हापूरमध्ये सिंपथीमुळे काँग्रेसने (Congress) जागा जिंकली. मात्र 2024 च्या निवडणुकीत कोल्हापूरची जागा आम्हीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis On Sanjay Raut)
संजय राऊतांना काम धंदा नाही
देशात दंगली (Riots In India) पेटवण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्या आरोपाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, संजय राऊत अतिशय फ्रस्ट्रेटेड व्यक्ती (Frustrated Person) आहे. त्यांना सध्या काही कामधंदा उरलेला नाही. त्यांच्यावर किती वेळा बोलायचं ? अशी बोचरी टीका त्यांनी केली.
प्रभू रामचंद्र सर्वांचे दैवत
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली.
याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, अयोध्येचा (Ayodhya) दौरा कुणीही करु शकतो.
प्रभू रामचंद्र सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्या दर्शनासाठी कुणी जात असेल तर त्याचं स्वागतच आहे. आम्हीदेखील अनेकदा त्या ठिकाणी जात असतो. कोणाला तिकडे जावं वाटत असेल, तर त्यात गैर काही नाही. श्री रामांचे भव्य मंदिर (Shri Ram Temple) तिकडे होत आहे, हे मंदिर पाहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे.
Web Title :- Devendra Fadnavis On Sanjay Raut | sanjay raut is a frustrated person he has no job criticism of bjp leader devendra fadnavis
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update