नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या राजकारणात काल मोठी घडामोड झाली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये युती (Shivsena-Sambhaji Brigade Alliance) झाल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत केली. यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. भाजपकडून (BJP) या युतीवर टीकेचा सूर लावला जात असताना याचा शिवसेनेला फायदा होणार नाही असे म्हटले आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सूचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला (Shivsena Dasara Melava) परवानगी देण्याबाबत देखील आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी, तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा आणि गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांची काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्याच्या मुद्यांवर भाष्य केलं.
LIVE | Media interaction | Nagpur https://t.co/6t2wcjocZE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 27, 2022
काँग्रेस एक बुडतं जहाज आहे. ज्यांना हे वाटतं की आता या जहाजाला वाचवता येणार नाही, असे लोक वेगळा निर्णय घेत आहेत. मला वाटतं गुलाम नबी आझाद यांनी काही वैध मुद्दे उपस्थित केले आहेत. मात्र, हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. यावर मी काय बोलणार, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेकडून सुरु करण्यात आली आहे.
मात्र, पोलीस प्रशासनाकडून (Mumbai Police) यासंदर्भात काय निर्णय घेतला जाईल, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
राज्य सरकार नियमाबाहेरचं काहीही करणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली आहे.
तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे नेते आहेत.
त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय काय आहे हे मला माहिती नाही.
ते मेळावा घेणार आहेत की नाही याची आपल्याला कल्पना नाही.
गृहमंत्री म्हणून एवढचं सांगतो, जे नियमात असेल ते आम्ही करु, असं फडणवीस म्हणाले.
Web Title : – Devendra Fadnavis | maharashtra home minister and bjp leader devendra fadnavis mocks uddhav thackeray on shivsena alliance with sambhaji brigade
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :