मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– NCP Chief Sharad Pawar | कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima) चौकशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची आज (गुरूवारी) आयोगासमोर साक्ष नोंदवण्यात आली आहे. या दरम्यान पवार यांनी या हिंसाचाराला तत्कालीन फडणवीस सरकार (Fadnavis Government) जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल (Retired Justice Jay Narayan Patel) आणि सदस्य सुमित मलिक (Sumit Malik) यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, ”जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. अशी परिस्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची होती, पण त्यांनी यामध्ये कुचराई केली. हे वेळीच थांबवता आलं असतं पण थांबवलं गेलं नाही. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस जबाबदार असतात.” असं ते म्हणाले.
”कोरेगाव भीमा हिंसाचार झाला त्यावेळी 2018 साली महाराष्ट्रात फडणवीस सरकार सत्तेत होतं. तसेच यावेळी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडेच होती. त्यामुळे पोलीस प्रशासन या घटनेला जबाबदार असल्याने सूचकपणे फडणवीसच यासाठी जबाबदार असल्याचं,” शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, ”कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमातील कायदा – सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची होती, त्यांनी योग्यवेळी काळजी घ्यायला हवी होती.
परंतु, त्यांनी योग्य वेळी कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष केले.” त्यामुळे ही दंगल झाल्याचा दावा शरद पवार यांनी चौकशी आयोगासमोर केला आहे.
Web Title :- Devendra fadnavis govt was responsible for koregaon bhima riots says sharad pawar
हे देखील वाचा :