अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांनी भाजपबाबत (BJP) केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) घटक पक्ष आहोत. तरीही, भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असं विधान कीर्तीकर यांनी केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. गजानन कीर्तीकर यांनी असं कुठेही म्हटलं नाही. या सर्व कल्पोकल्पीत बातम्या असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1661999159313043458?s=20
कीर्तीकर यांनी लोकसभेच्या (Lok Sabha Elections) 22 जागांवर दावा केला आहे, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्यात कोणतीही समस्या नाही. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष समन्वयाने काम करत आहेत. आमच्यात सर्व गोष्टी ठरतील तेव्हा तुम्हाला सांगू, असं त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले गजानन कीर्तीकर?
गजानन कीर्तीकर म्हणाले, आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आलो.
आमचा शिवसेना (Shivsena) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटक पक्ष असल्याप्रमाणेच आमची कामं झाली पाहिजेत. (Maharashtra Politics News) मी हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला. भाजपकडून आम्हाला घटकपक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला वागवले गेले पाहिजे. मात्र, भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप कीर्तीकर यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis reply gajanan kirtikar comment over bjp behavioral behavior shinde group 13 mp
हे देखील वाचा :
Deepak Kesarkar | मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? दीपक केसरकर यांनी स्पष्टचं सांगितले