पुणे : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) मेळाव्यावर आता जोरदार प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भाषणावरून दोन्हीकडील नेते आणि समर्थक टीका-टिपण्णी करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मेळाव्यात भाजपाचीच स्क्रीप्ट वाचून दाखवल्याची टीका सध्या होत आहे. या टीकेला उत्तर देताना भाजपा (BJP) नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांनाच सल्ला दिला आहे की, उद्धव ठाकरे यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचे कौतुक करताना आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर निशाणा साधताना म्हटले की, मुंबईसह, उर्वरीत महाराष्ट्रातून कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला आले होते. त्यामुळे, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच हे कालच्या मेळाव्याने दाखवून दिले. त्यामुळे, मी मुख्यमंत्री शिंदेंचे अभिनंदन करतो. उद्धव ठाकरेंनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे, दरवेळी तेच ते तेच ते.. एकतर स्क्रीप्ट रायटर बदला किंवा स्क्रीप्ट रायटरला क्रिएटीव्ह लिखाण करायला लावा. विधानसभेवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या युतीचा भगवा फडकणारच, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मी दोन्ही भाषणे ऐकली नाहीत.
कारण, मी धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. त्यानंतर, दोन्ही भाषणाचा थोडा थोडा सारांश मी ऐकला.
युट्यूबवर एकनाथ शिंदेंचे भाषण बघितले.
मी एवढंच सांगू शकेल, मी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही,
कारण शिमग्यावर कधीच प्रतिक्रिया द्यायची नसते. खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले.
कारण, शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट गर्दी शिंदेंच्या मेळाव्याला होती.
Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis on uddhav thackeray shivsena eknath shinde dasra melava 2022
हे देखील वाचा :
Kolhapur ACB Trap | 3 हजारांची लाच घेताना सहाय्यक लेखाधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात