मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ‘विधिमंडळ हे ‘चोर’ मंडळ’ असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे विधीमंडळात गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळात (Legislature) हा मुद्दाउपस्थित करुन हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला बोल केला आहे. ‘तुमचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील याच विधान मंडळाचे सदस्य आहेत, तेही चोर मंडळाचे सदस्य ठरतात’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राऊतांच्या विधानाचा समाचार घेतला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, संजय राऊत हे जे बोलले ते मी स्वत: ऐकले आहे. आणि मला स्वत:ला तरी असं वाटतं की चोर मंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेलं बरं. कशासाठी चोर मंडळात काम करायचं. जर कोणी याला चोर मंडळ असेल तर ते सहन करण्यासारखं नाही. तुमचे नेते उद्धव ठाकरे देखील याच सभागृहाचे सदस्य आहेत, मग आम्ही सर्वच चोर ठरतो का? संजय राऊतांनी उघडपणे चोर मंडळ, गुंडा मंडळ म्हटले आहे. आम्ही काय गुंड आहोत का? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीसानी विचारला आहे.
संपूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हणणे हे कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. असे प्रकार जर आपण सहन करणार असू, तर ते गंभीर ठरेल.
उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत,मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?
(विधानपरिषद।दि.1 मार्च 2023)#SanjayRautAbusesVidhanMandal pic.twitter.com/1XC3bxVDyN— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 1, 2023
हक्कभंग आयुध दिलं कशासाठी?
फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील विधानमंडळ हे देशातील सर्वोत्तम विधानमंडळ म्हटले जाते. पण मंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार दिला तर मग या विधानमंडळावर कुणाचा विश्वास राहणार नाही. न्यायालयाच्या विरोधात बोलल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट (Contempt of Court) होतं. तसेच विधान मंडळावर कोणी काही बोलू नये म्हणून हक्कभंगाची व्यवस्था केली आहे. आपल्याला हक्कभंग आयुध दिलं कशासाठी? असे फडणवीस म्हणाले.
तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील…
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, संजय राऊत हे साधे नेते नसून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मोठ्या सभागृहाचे नेते अस करतील तर कसं सहन करणार? हक्कभंग घ्यायचा असेल तर घ्या नाही तर नका घेऊ. पण आम्ही याचा निषेध नोंदवला नाही तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील आणि विधान मंडळाला चोर म्हणतील. सरकार म्हणून मी लोकांच्या भावना समजून घेतो. व्यक्ती कोणीही असो आमच्या पक्षातील असला तरी विधानमंडळाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. आशा व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे हे जनता पाहात असल्याचे फडणवीसांनी सांगितलं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadanvis sanjay raut so we are all thieves along with uddhav thackeray devendra fadnavis attacked sanjay raut
हे देखील वाचा :