मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये (Shanmukhananda Hall) भाजपच्या (BJP) मेळाव्यात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला. आमचे मुख्यमंत्री घरात बसणार नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. तसेच शोले स्टाईल डायलॉग मारत उद्धव ठाकरे गटाचा (Thackeray Group) समाचार घेतला आणि खिल्ली उडवली. ‘माझा उल्लेख करताना कोणीतरी मला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणाले. पण माझं शरीर अमजद खानसारखे (Amjad Khan) आहे. त्यामुळे मी विचारु शकतो की कितने आदमी थे… 65 में से 50 निकल गए और सब कुछ बदल गया’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी तुफान फटकेबाजी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दहीहंडी उत्सव यावरून ठाकरेंना टोला
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का ? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती दिसून आली. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहिहंडी (Dahihandi) जोरात होती. आता गणपती, नवरात्र असे सर्व उत्सव जोरात करायचे आहेत. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडून काम करत नसल्याची टीका भाजपकडून केली जात होती.
मुंबईत शिवसेना – भाजपचा महापौर
यावेळी बोलताना फडणवीस यांनी येत्या काळात मुंबई महानगर पालिकेवर (Mumbai Municipal Corporation (BMC) भाजप-शिवसेना युतीचाच (BJP-Shiv Sena Alliance) झेंडा असेल, असा निर्धार व्यक्त केला. मागील काळात आशिष शेलार (Ashish Shelar) मुंबईचे अध्यक्ष असताना आपण पालिकेत मोठी मजल मारली. तेव्हाही आपण महापौर (Mayor) बनवू शकलो असतो. आपली पूर्ण तयारी झाली होती. पण आपल्या मित्रपक्षासाठी आपण दोन पाऊल मागे आलो. पण आता मुंबई पालिकेवर शिवसेना- भाजप युतीचाच महापौर बसेल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांवर चालणारी आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि भाजपा मिळून या निवडणुकीत आपला भगवा पालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही असे म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
किक कशी मारायची, हे तुम्हाला माहिती आहे
आशिष शेलार यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा संघटनांच्या पदावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली. आशिषजी, तुम्ही क्रिकेट खेळणारेही आहात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्षही राहिला आहात. त्यामुळे 20-20 कशी खेळायची आणि जिंकायची हे तुम्हाला माहिती आहे. हा सामना तुम्ही जिंकणारच आहात. पण महापालिकेत मुंबई विकास लीग आपल्याला सुरु करायची आहे. मध्ये मध्ये अडचणी येतात. तुम्ही फुटबॉलची अनेक मैदानं तयार केली आहेत. त्यामुळे मध्ये एखादा फुटबॉल आला, तर त्याला किक कशी मारायची, हे तुम्हाला माहिती आहे असं ते म्हणाले.
उड्या मारणारी अनेक मंडळी आहेत
अनेक उड्या मारणारी मंडळी देखील आहेत. पण शेलार हे दोरीउड्या असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत,
त्यामुळे कोणाला किती उडू द्यायचं आणि कोणाची दोरी कधी खेचायची हे देखील शेलारांनाही कल्पना आहे.
त्यामुळे आता मला विश्वास आहे की गेल्या वेळी तुम्ही जो स्ट्राईकरेट दाखवला, तो दुपटीहून अधिक होता.
आपण थेट 35 वरुन 82 वर होतो. यावेळी गेल्यावेळचा रेकॉर्ड मोडला पाहिजे.
Web Title : – Devendra Fadnavis | BJP leader and DCM devendra fadnavis mocks shivsena uddhav thackeray bmc election bjp melava
हे देखील वाचा :
Rain in Maharashtra | राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागात धुवाँधार पाऊस
Pune Crime | शालेय मुलीच्या लैंगिक शोषणाची प्रशासनाकडून गंभीर दखल, ‘तो’ नराधम शिक्षक निलंबित