Devendra Fadnavis At Bhau Rangari Ganpati | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन (Videos)

Devendra Fadnavis-Punit Balan

पुणे : Devendra Fadnavis At Bhau Rangari Ganpati | शहरात बाप्पाच्या आगमनापासून गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. दरम्यान आज (दि.१६) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेत आरती केली.

यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करून त्यांना सन्मानित केले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे ट्रस्टचे बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहात आहेत. यावेळी फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुलरीधार मोहोळ (Murlidhar Mohol) उपस्थित होते.

बाप्पाच्या आगमनापासूनच येथे अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा याठिकाणी प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. उद्या बाप्पाला निरोप द्यायचा असल्याने आज याठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त उपस्थित आहेत.