नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या घराची भिंत ओलांडून त्यांना अटक करणार्या अधिकार्यासह 28 सीबीआय अधिकार्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. अधिकार्यांनी सांगितले की, मागील वर्षी आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना अटक करणारे पोलीस अप अधीक्षक रामास्वामी पार्थसारथी यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. पार्थसारथी यांनीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनाही अटक केली होती.
अधिकार्यांनी सांगितले की, सीबीआयचे सह संचालक धीरेंद्र शंकर शुक्ला यांनाही विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले आहे. त्यांनी मुंबईचे पत्रकार जेडे यांच्या हत्येचा यशस्वी तपास केला होता आणि संयुक्त अरब अमीरातहून भारतीय नागरिक रोशन अन्सारी यास भारतात आणणार्या टीमचे नेतृत्व केले होते. त्यांनी गुरमीत राम रहीमच्या अनुयायांशी संबंधित प्रकरणाचाही तपास केला होता.
ही आहेत नावे
विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित पोलीस अधिकार्यांमध्ये बिनय कुमार, मनोज वर्मा, निर्भय कुमार, रवी नारायण त्रिपाठी, मुकेश वर्मा, नितेश कुमार, बरुण कुमार सरकार, नारायण चंद्र साहू, नंद किशोर, नूर अली शेख आणि रोहिताश कुमार धिनवा यांचा समावेश आहे.
Visit : bahujannama.com