नवी दिल्ली: बहुजननामा ऑनलाइन : पावसाळा सुरू होताच डेंगूचा धोका सुद्धा वाढतो. असे समजले जाते की, ताप आल्यानंतर डेंगू आहे आणि ताप नसल्यास डेंगूच्याबाबत लोक विचार करत नाहीत. मात्र, असे करणे चुकीचे आहे कारण तापाशिवाय सुद्धा डेंगू होऊ शकतो. तापाशिवाय कोणता डेंगू होतो आणि हे कसे ओळखावे ते जाणून घेवूयात…
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, जरनल ऑफ फिजिशियन ऑफ इंडियामध्ये प्रकाशित ए क्यूरियस केस ऑफ एफेब्रिल डेंगू नावाच्या शोधनिबंधात सांगण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या डेंगूला एफेब्रिल डेंगू म्हणतात. एफेब्रिल डेंगूची लक्षणे सामान्य डेंगूपेक्षा वेगळी असतात. सामान्य डेंगूमध्ये रूग्णाला खुप ताप आणि वेदना होतात. मात्र, डायबिटीज, ज्येष्ठ व्यक्ती आणि कमजोर इम्यूनिटीच्या लोकांमध्ये तापाशिवाय सुद्धा डेंगू असू शकतो.
अशा रूग्णांना ताप नसतो, परंतु डेंगूची दुसरी लक्षणे जरूर असतात. ही लक्षणे सुद्धा खुप अस्पष्ट असतात. अशा प्रकारच्या डेंगूमध्ये खुप कमी इंफेक्शन होते. रूग्णाला ताप, अंगदुखी, त्वचेवर रॅश या तक्रारी नसतात. पण टेस्ट केल्यानंतर त्यांच्या शरीरात प्लेटलेट्सची कमतरता, व्हाइट आणि रेड ब्लड सेल्सची कमतरता दिसून येते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जर कुणाला
1. शरीरात वेदना
2. थकवा
3. भूक न लागणे
4. हलकी रॅश
5. लो ब्लड प्रेशर, अशा समस्या होत असतील, आणि ताप नसेल, तर तो डेंगू असू शकतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.