बहुजननामा ऑनलाइन टीम – नाशिक : लोकशाहीत लोकप्रतिनिधी मदतान करून निवडले जातात, परंतु महाराष्ट्रातील दोन गावात सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पदासांसाठी लिलाव आयोजित करण्यात आला. येथे लोकशाहीला काळिमा फासत या पदांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली गेली. एका गावात सरपंचपद 2 कोटीत विकले गेले तर दुसर्यामध्ये 42 लाख रुपयांची बोली लागली. लिलावाचा हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयुक्त युपीएस मदन यांनी दोन्ही गावांची निवडणूक रद्द केली.
ही प्रकरणे नाशिक जिल्ह्यातील उमरण आणि नंदुरबार जिल्ह्यातील कोंडामाळी गावातून समोर आली आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांसाठी उमरण आणि कोंडामाळी गावात लिलावाबाबत मीडिया रिपोर्ट आला आहे. तहसीलदार, एसडीओ, निवडणूक पर्यवेक्षक, आणि कलेक्टरकडून रिपोर्ट मागवण्यात आला होता. तक्रारींची पडताळणी, आणि रिपोर्ट आणि मीडिया रिपोटनंतर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक आयुक्तांनी दोन्ही जिल्ह्यांच्या कलेक्टरना आदेश दिले आहेत की, लिलावात सहभागी लोकांच्याविरोधात केस दाखल करण्यात यावी आणि आयोगाला रिपोर्ट देण्यात यावा. मदन यांनी म्हटले की, गावातील काही लोकांमुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक लोक उमेदवार बनू शकले नाहीत आणि मतदारांना आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मत टाकण्यापासून वंचित करण्यात आले. हे लोशाहीचे मुळ आणि आचारसंहितेचे उल्लंघन आहे.
सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की उमरणच्या कांदा बाजारात काही लोक सरपंच पदासाठी बोली लावत आहेत. ही घटना 27 डिसेंबरची आहे. 1.1 कोटी रुपयांपासून लिलाव सुरू झाला आणि सर्वात जास्त बोली 2 कोटींची लागली.
एक अन्य व्हिडिओ कोंडामाळीतून समोर आला आहे, जिथे सरपंच पदासाठी 42 लाख रुपयांची बोली लागली. ही रक्कम मंदिर बांधकामासाठी देणार असल्याचे सांगण्यात आले होते. नाशिकचे कलेक्टर नितिन गावंडे यांनी आदेशाला दुजोरा देत सांगितले की, पूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे आणि येथे पुन्हा निवडणूक प्रक्रियेची घोषणा करण्यात येईल.
ट्विटरवर व्हिडिओ शेयर करत एका यूजरने लिहिले, सरपंच पदासाठी 2 कोटीची बोली लागत आहे. कलम 14 सर्वांना समान अधिकार देते. परंतु श्रीमंत लोकांना येथे प्राथमिकता मिळत आहे. हे स्पष्ट आहे की जो 2 कोटी रूपये भरणार तो भ्रष्टाचारातून 10 पट कमावणार. लोकशाहीची क्रुर चेष्टा सुरू आहे